जळगाव(प्रतिनिधी)-शैक्षणिक वर्ष २०१२-२०१३ साठी आदर्श शिक्षक राज्य शिक्षक पुरस्कर निवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला असून त्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाशी संलग्नित महाविद्यालये/परिसंस्थांमधील मान्यताप्राप्त प्राध्यापकांना शासन निर्णयाच्या अधिन राहून अर्ज करावयाचे असतील त्यांनी दि. ५ जानेवरी पर्यंत विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांचे शिक्षक आणि प्रशाळा/विभागातील शिक्षक यांनी दि. ५ जानेवारीपर्यंत संबंदित महाविद्यालयांच्या प्राचार्यामार्फत विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन कुलसचिव डॉ. अशोक महाजन यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे जनसंपर्क अधिकारी (उ.म.वि. जळगाव) यांनी कळविले आहे.