निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीत वाढ

0
3

अमळनेर (प्रतिनिधी)– शालेय जीवनात अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर त्यांच्या कल्पना शक्ती नेहमीच वाढत जात असते, असे अमळनेर येथे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई विचारमंच समितीने आयोजिलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी अमळनेरच्या नगराध्यक्षा जयश्री पाटील म्हणाल्या.

व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजी पाटील गांधलीकर होते. प्रमुख अतिथी नगरपालिकेच्या शिक्षण सभापती रेखा पाटील, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनेश माळी, साहित्यिक गं.का. सोनवणे, गोकूळ बागुल, बाळासाहेब महाजन, सुरेश सोनवणे, दशरथ लांडगे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचारमंच समितीचे अध्यक्ष ईश्वर महाजन यांनी केले.

अध्यक्षीय भाषणातून प्रा.शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून महिलांनी खंबीर बनले पाहिजे, असे सांगितले. २० स्पर्धकांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एच.विंचूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण महाजन, डी.ए.सोनवणे, ईश्वर महाजन, निरंजन पेंढारे, वसुंधरा लांडगे, अश्विन पाटील, भारती चव्हाण, दत्तू चौधरी, अमोल माळी, चंद्रकांत ठाकूर यांनी प्रयत्न केले. आभार डी.ए.सोनवणे यांनी मानले.

शून्य प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या