जळगाव-युवा सेनेतर्फे उद्या जाहीर होत असलेला बारावी परिक्षेचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
उद्या दि. २५ मे २०१२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईट वर निकाल पाहता येणार आहे. या गुणपत्रिकेची प्रत अधिकृत प्रवेशासाठी ग्राह्य मानली जाणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकेची वाट पहावी लागणार नाही.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही युवा सेना, जळगाव यांच्यातर्फे गुणपत्रिकेची प्रत विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा गोलाणी मार्केटमधील शिवसेना महानगर कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. तुषार भांबरे :९५७९७९४१४३ आणि
विनायक कोळी: ९६६५४३२१०५
