चाळीसगाव (प्रतिनिधी)– वीज ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी येथील विज वितरण कंपनीच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

विज ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी. विज चोरी, विजेचा वापर, विजेची हानी, विज उपकरणांबद्दल सुरक्षितता आणि विजेची बचत हीच विज निर्मिती याबाबतची माहिती या रॅलीद्वारे ग्राहकांना देण्यात आली. या उपक्रमाबद्दल व्यापारी असोसिशनचे प्रदीपदादा देशमुख, नगराध्यक्षा अनिता चौधरी, उपनगराध्यक्ष प्रदीप निकम, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पो.नि. संजय देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या. आज सकाळी १० वाजता रॅलीची सुरूवात तहसिल कार्यालयापासून झाली.
रॅलीमध्ये सहाय्यक अभियंता धीरज चव्हाण, के.डी. ठाकरे, एस.के. पिंपळे, गणेश अशमार, टी.एच. माळी, तुषार पाटील, उज्ज्वल जगताप, प्रताप सपकाळे, अनंत कुळकर्णी, यांच्यासह बहुूसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.

Exif_JPEG_420

Bookmark and Share