जळगाव(वि.प्र.)- महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आयएएस व्हावेत यासाठी गेल्या दहा वर्षापासून मिशन आयएएसचे प्रशिक्षण देणार्‍या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने महाराष्ट्रातील पाचव्या वर्गापासून आयएएसची तयारी करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे.
२००२ मध्ये जेव्हा मिशन आयएएस सुरु करण्यात आले तेव्हा महाराष्ट्रातून फक्त २२ मुले आयएएस होत होती. आता मात्र ९२ मुले आयएएस झालेली आहेत. मिशनने संपूर्ण महाराष्ट्रात गोव्यापासून गोंदियापर्यंत मी आयएएस अधिकारी होणारचं हा उपक्रम राबवून व जवळपास दोन हजार स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन व्यापक जनजागृती केली आहे.
हेल्पलाईन ही २४ तास सुरु राहणार आहे. याशिवाय http://www.iasmission.com या वेबसाईटवरही किंवा iasmission @ gmail. com या ईमेल द्वाराही विनामुल्य माहिती उपलब्ध होऊ शकते. या उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या व आयएएसबाबत विनामुल्य माहिती हवी असणार्‍या जिज्ञासुंनी अधिक माहितीसाठी मिशनचे आयएएस जळगाव विभागाचे विभागीय समन्वयक प्रमोद पाटील (मो.९३२६३ ५९२२९) व मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे, संचालक मिशन आयएएस, महापौरांच्या बंगल्यासमोर, महाराष्ट्र बँकेच्या मागे, विद्यापीठरोड अमरावती कॅम्प या पत्त्यावर किंवा फोन करुन प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे.